नागपूर शहर: युनिट-३ कडून सराईत टोळी जेरबंद; ५ गुन्ह्यांचा उलगडा
दोन मे ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार दुकानांचे कुलूप तोडून चोऱ्या करणाऱ्या एका सराईत टोळीला क्राईम ब्रांच युनिट-३ ने अटक केली आहे. या कारवाईमुळे एकूण ५ गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी आरोपींकडून रोकड आणि ३ वाहने असा एकूण १,४३,७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अटक केलेल्या आरोपीमध्ये मोहम्मद दिलशाद अंसारी, विवेक ऊर्फ विक्की धोटे आणि पीयूष ऊर्फ गुड्डू निमजे यांचा समावेश आहे.आरोपींनी कोतवाली परिसरात घरफोडी, तर नंदनवन, यशोधरा नगर आणि जरीपटका भागात वा