समुद्रपूर: गिरड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत वृक्षलागवड संबंधी करण्यात आले मार्गदर्शन
गिरड येथील गुरुदेव सेवा मंडळ व निर्सग प्रेमींच्या पुढाकाराने गावातील मिशन १० हजार वृक्षलागवड मोहिमे हाती घेतली असून याच अनुषंगाने शुक्रवारी ११ वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मुले आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा गिरड येथील विद्यार्थ्यांना वृक्षलागवड संबंधी मार्गदर्शन करुन घर तिथे फळझाड या दृष्टिकोनातून सीताफळ रामफळ आवळा बेल आंबा या प्रजातींचे वृक्ष घरी लावण्याकरिता देऊन विद्यार्थ्यांकडून या झाडांना जगवण्याचा संकल्प करण्यात आला.