समुद्रपूर: तालुक्यातील २१० शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांची विद्या विकास महाविद्यालयात पार पडली तंबाखुमुक्त कार्यशाळा
शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या संयुक्तीत पंचायत समिती समुद्रपूर अंतर्गत आरोग्याच्या दृष्टीने तंबाखुमुक्त शाळाचे आयोजन आज २६ जुलै रोजी २ वाजता विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर येथे पार पडले यात संपूर्ण तालुक्यातील शाळेचे मुख्याध्यापक कार्यशाळेला उपस्थित होते.या तंबाखुमुक्त कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून समुद्रपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक गिद्देवार तर सलाम मुंबई फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड होते.