सेनगाव: शिवनी बुद्रुक येथे बदली झालेल्या शिक्षकांचा निरोप समारंभ तर नवीन शिक्षकांचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत
सेनगांव तालुक्यातील शिवनी बुद्रुक या ठिकाणी आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शिक्षकांचा निरोप समारंभ व नवीन शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक वृंद व विद्यार्थी तसेच मान्यवर उपस्थित होते. तसेच याप्रसंगी शिवनी बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सरकटे सर व जाधव सर तुरुकमने सर तांबिले सर यांना निरोप तर कावरखे सर शेळके सर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक,जेष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.