वसई: राष्ट्रीय महामार्गावर वसई फाटा ओव्हर ब्रिज, संस्कृती हॉस्पिटलजवळ झालेल्या अपघातात एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
Vasai, Palghar | Apr 18, 2024 मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या मुंबई वाहिनीवर वसई फाटा ओव्हर ब्रिज, संस्कृती हॉस्पिटलजवळ झालेल्या अपघातात एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. पेल्हार पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई योगेश चौगुले हे बिट मार्शल म्हणून कर्तव्यावर असताना मंगळवारी पहाटे त्यांना अपघाताची माहिती मिळाली. अंदाजे ३५ ते ४० वर्षीय इसमास अज्ञात वाहनचालकाने भरधाव वेगात ठोकर मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.