नागपूर शहर: पत्नीच्या निधनाने दुःखी झालेल्या पतीची आत्महत्या : कैलास देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी 1 मे ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार आपल्या पत्नीचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याने नैराश्यात असलेल्या पतीने स्वतःचे जीवन संपवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदनवन भागातील पडोळे नगर येथे राहणारे ४२ वर्षीय राहुल थेर यांच्या पत्नीचा दहा महिन्यांपूर्वी आजारपणामुळे मृत्यू झाला होता. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे.