संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.दरम्यान या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया उद्या रविवारी २१ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रियेकडे उमेदवारांसह पक्षश्रेष्ठींचे लक्ष लागले आहे.वीर भीमा नायक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपळनेर येथे सदर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून २० प्रभागातील उमेदवारांच्या मतमोजणीसाठी १० टेबल लावण्यात आले असून सकाळी १० वाजता या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.कमीत कमी दो