हिंगोली: राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्य वाहतूक विरोधात कारवाई,5 लाख 64 हजार 315 रुपयाचा मुद्देमाल केला हस्तगत
हिंगोली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जिल्ह्यात अवैध मद्य वाहतूक विरोधात छापे टाकून ५३ आरोपी विरोधात दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या बाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार महात्मा गांधी सप्ताह निमित्त जिल्ह्यांत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक, भरारी पथक, तसेच दुय्यम निरीक्षक यांच्या पथकाने सेनगांव, कळमनुरी, हिंगोली, वसमत, औंढा परिसरात अवैध मद्य विक्री, वाहतुक विरोधात छापे टाकून ५३ आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत