साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे नरेंद्रचार्य महाराजांचा पादुका दर्शन सोहळा १८ रोजी सकाळी १० वाजता सामोडे चौफुली राजे छत्रपती इंग्लिश मीडियम शाळेजवळ होणार आहे. यासाठी ध्वजारोहण व भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला.रामानंदचार्य नरेंद्रचार्य महाराजांच्या समाजपयोगी कार्याला चालना मिळावी यासाठी पादुका व गुरुपूजन सोहळा आयोजित केला आहे. त्यानिमित्त ध्वजारोहण व भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला प्रमुख हिमाक्षी चौधरी यांनी माहिती दिली.