नागपूर शहर: GST कायदा सुलभ करा, व्यापाऱ्यांना जाचक नोटिसांपासून दिलासा द्या: आमदार प्रवीण दटके यांची आक्रमक मागणी
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, जीएसटी (GST) सुधारणा विधेयकावर चर्चा करताना आमदार प्रवीण दटके यांनी व्यापारी आणि उद्योजकांच्या समस्यांवरून सरकारचे लक्ष वेधले. "व्यापाऱ्यांना त्रास देणारी व्यवस्था नको, तर विश्वास देणारी व्यवस्था हवी," अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या सुधारणा सुचवल्या आहेत.