नागपूर शहर: परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे हाल; केंद्रावर प्रवेश नाकारल्याने विद्यार्थीनिने व्यक्त केला संताप, विडिओ वायरल
[
आज नागपूरमधील नीट परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाल्याचे समोर आले आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना काही मिनिटांच्या उशिरामुळे परीक्षा केंद्राच्या आत प्रवेश नाकारण्यात आला. विशेष म्हणजे, परीक्षेसाठी वेळेत पोहोचूनही केवळ काही मिनिटांच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले.