नाशिक: म्हसरूळ भागातील ग्लोबल स्कूल समोर ओमकार नगर येथून महागडी गाडी चोरी
Nashik, Nashik | Sep 14, 2025 म्हसरूळ भागातील ग्लोबल स्कूल समोर ओमकार नगर येथून महागडी गाडी चोरी केल्याची घटना 12 सप्टेंबर रोजी झाली असून 13 सप्टेंबर रोजी 6 वाजता म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 सप्टेंबर रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा खंडू गवळी राहणार सुरगाणा यांची 1 लाख 25 हजारांची यामाहा मोटर सायकल ओमकार नगर येथे उभी केलेली असताना अज्ञात चोरट्याने हॅन्डल लॉक तोडून चोरून नेली. याप्रकरणी पोलीस हवालदार शिंदे पुढील तपास करीत आहे.