समुद्रपूर: राष्ट्रीय महामार्गावरील कानकाटी शिवारात रसत्यावर नादुरुस्त उभ्या ट्रकाला मागून येणाऱ्या ट्रकची धडक: एकाचा मृत्यू
समुद्रपुर तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कानकाटी शिवारात ४ जुलै रोजी साडेचार वाजताच्या सुमारास ट्रक क्रमांक एम एच ३४ बि.झेड २४१६ हा ट्रक पंचर झाल्याने चालकाने ट्रक रस्त्यावर उभा केला त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक युके ०६ सिसी ०३६२ चालकास रस्त्यावर उभा ट्रक दिसून न आल्याने मागून जोरदार धडक लागून अपघात झाला यामध्ये ट्रक क्रमांक युके ०६ सिसी ०३६२ चालकास गंभीर जखमी झाला.उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.