समुद्रपूर: मोहगांव येथिल जिल्हा परिषद शाळा परीसरात वनविभाग व मगन संग्रहालयाचे वतीने करण्यात आले वृक्षारोपण
गिरड येथे वन विभाग व मगन संग्रहालयाच्या वतीने वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली असून या वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे व मगन संग्रहालयाचे समन्वय गजानन गारघाटे यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी १२ वाजता मोहगांव येथिल जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी साय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी पि.एन.नेहारे, मुख्याध्यापक रमेश वाघमारे, विष्णू बाम्रणवाडे,वनरक्षक विजय दिघोळे सुशिल लांडगे,गोंडाने आदिंच्या उपस्तिथ विद्यार्थ्यांना वृक्षलागवडी संबंधी मार्गदर्शन केले