घनसावंगी: जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पारडगावचा खाकी वर्दीतील सितारा चमकला..
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पारडगावचा खाकी वर्दीतील सितारा चमकला.. आज दिनांक 4 सोमवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील रहिवासी रामेश्वर सर्जेराव काळे यांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर मजल मारत खाकी वर्दीचे स्वप्न साकार केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेत त्यांनी यश मिळवत ही उल्लेखनीय कामगिरी केली. रामेश्वर काळे यांचे प्राथमिक शिक्षण पारडगाव येथ