नागपुरातील एम पी बस स्थानकाजवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका खासगी बसला आज अचानक भीषण आग लागली. 'अमीना ट्रॅव्हल्स'ची ही बस नागपूरहून छिंदवाड्याच्या दिशेने जाणार होती. सुदैवाने, या घटनेच्या वेळी बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.