तुमसर शहरातील साई कॉलोनी येथे दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ०७.३० वाजेच्या दरम्यान, राजकुमार तुकाराम तितीरमारे (वय ४८, रा. साई कॉलोनी, तुमसर) या व्यक्तीचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या एका महिन्यापासून प्रकृती खालावलेल्या राजकुमार यांची एक किडनी खराब झाली होती आणि ते अंथरुणावरच होते. त्यांचे वडील, तुकाराम पांडुरंग तितीरमारे (वय ७६) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी त्यांना उठवण्यासाठी गेले असता राजकुमार बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने खासगी