यवतमाळ: शहरातील पार्वती शोरूम सर्विसिंग सेंटर जवळ उभी दुचाकी लंपास
यवतमाळ शहरातील पार्वती शोरूम सर्विसिंग सेंटर जवळ उभी करून ठेवलेली दुचाकी दिनांक 18 ऑक्टोबर रोजी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. सदर दुचाकीच्या क्रमांक एमएच 29 बीए 3046 असून किंमत 20 हजार रुपये आहे. सदर प्रकरणी 2 नोव्हेंबर रोजी गणेश भेंडारकर यांच्या फिर्यादीवरून अवधूतवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.