मुंबई उपनगर: महाराष्ट्रात २९ सप्टेंबर रोजी १००० रोजगार मेळावे होणार
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत २९ सप्टेंबरला महाराष्ट्रभर एक हजार रोजगार मेळावे आयोजित होतील. मुंबईत मीनल क्रीडा मंडळात मंत्री लोढा यांनी युवकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं. लोकसंवाद-२०२६ अंतर्गत रोजगार आणि विविध योजनांची जनजागृती सुरू आहे.