जालना: शिक्षण सभापती भाग्यश्री जोगस यांना डावलून शिक्षकांच्या बदल्या?; महानगरपालिकेत चर्चेला उधाण
Jalna, Jalna | Jul 11, 2026 जालना महानगरपालिकेच्या शिक्षण व विद्युत समितीच्या सभापती भाग्यश्री सुजित जोगस यांना विश्वासात न घेता शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे महानगरपालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, उपायुक्त नंदा गायकवाड आणि शिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने काही शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. या बदल्यांमध्ये ज्योती गणेश सिंग ठाकूर यांची जालना महानगरपालिका प्राथमिक शाळा एसआरपीएस क्र. १ येथे, विजय आडे यांची