नागपूर शहर: एस के बार मध्ये हंगामा करणाऱ्या आरोपींना हुडकेश्वर पोलिसांनी केली अटक : अनामिका मिर्झापुरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी 19 मार्चला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार, शुल्लक वादातून एस के बारमध्ये हंगामा करणाऱ्या आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत आरोपींना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी दिली आहे.