नागपूर ग्रामीण: वानाडोंगरीत ४ किलो गांजासह तरुण गजाआड : सिंगा ऋषिकेश रेड्डी पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांनी 10 जुलैला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार वानाडोंगरी परिसरात ४ किलो ३० ग्रॅम गांजाची विक्री करणाऱ्या निहाल प्रमोद तडस याला एमआयडीसी पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे.डीसीपी परिमंडळ-१ च्या विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी वायसीसी कॉलेजसमोरील आर्यन जिमजवळ सापळा रचला होता. यावेळी संशयास्पद स्थितीत आढळलेल्या निहाल तडस याला पाठलाग करून पकडण्यात आले. त्याच्याकडील बॅगेत ६० हजार रुपये किमतीचा ४ किलो ३० ग्रॅम गांजा मिळू