फलटण: शहरातील गणेश आगमन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडल्याने १० डीजे मालकांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल
श्री गणेश आगमनादिवशी शनिवारी सायंकाळी फलटण शहरात विविध गणेश मंडळांनी गणेशमूर्ती घेवून जाताना मिरवणूका काढल्या असताना डीजे मालकांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्याने १० डीजे मालकांविरुध्द फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फलटण शहर पोलीसांनी आज रविवार दि. ८ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता माहिती दिली. शनिवार दि. ७ सप्टेंबरला सायंकाळी ७ नंतर फलटण शहरात श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अनेक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेश आगमनाच्या मिरवणुका काढल्या होत्या.