नागपूर शहर: ई रिक्शा मध्ये प्रवाशांचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, गुन्हे शाखा सोनसाखळी चोरी विरोधी पथकाची कार्यवाही
23 एप्रिल ला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार , प्रवासी ई रिक्षा मध्ये प्रवाशाला बसवून त्यांचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने अटक केली आहे. यामध्ये पती-पत्नी सह अन्य एका महिलेचा समावेश आहे.अटकेतील आरोपींमध्ये कृष्णा जाधव, शिवानी जाधव व कॅटरिना थॉमस यांचा समावेश असून त्यांच्याकडून ई रिक्षा किंमत एक लाख रुपये जप्त करण्यात आले आहे पुढील कारवाई साठी आरोपींना इमामवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.