नागपूर शहर: नागपूर मेडिकल हॉस्पिटलमधील ए.सी. चे तांब्याचे पाईप चोरणाऱ्या चोराला अजनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या : नितीन चंद्र राजकुमार
अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी 6 एप्रिल ला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटल आणि अति विशेषोपचार रुग्णालय परिसरात ए.सी. ला लागणारे तांब्याचे पाईप चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला अजनी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिली आहे.