पनवेल: गांजा तस्करीप्रकरणी कल्याण पोलिसांचा १७ आरोपींवर मोक्का; DCP अतुल झेंडे यांची ठाणे आयुक्तालयाअंतर्गत पहिलीच कारवाई
Panvel, Raigad | Oct 10, 2025 तरुणाईला व्यसनाच्या विळख्यात ओढणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कल्याण पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या (एनडीपीएस) गांजा तस्करी प्रकरणात तब्बल १७ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गांजा तस्करीप्रकरणी मोक्कांतर्गत झालेली अशा प्रकारची ही पहिलीच कार्यवाही आहे.पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यवाही पथकाकडून केला जात आहे.