जालना: रेल्वे स्थानक परिसरात आरक्षणाच्या नावाखाली जादा पैसे घेतल्याचा आरोप
प्रवाशांची तक्रार; आरपीएफकडून कारवाई करण्याची मागणी
Jalna, Jalna | Sep 18, 2026 जालना रेल्वे स्थानक परिसरात आरक्षण तिकीट बुकिंगच्या नावाखाली प्रवाशांकडून जादा पैसे घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील तिकीट बुकिंग व्यवस्थेबाबत प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी रेल्वे स्थानक परिसरात तिकीट आरक्षणाच्या प्रकरणात दोन दलालांना आरपीएफकडून पकडण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, या कारवाईनंतर नेमकी काय कारवाई करण्यात आली, संबंधितांवर कोणती कलमे लावण्यात आली आणि प्रकरणाचा पुढील तपास काय झाला, याबाबत स्पष्ट माहिती मिळा