हवेली: सोरतापवाडी येथे पुणे सोलापूर महामार्गावर टेम्पो व स्कूल बसचा भीषण अपघात
Haveli, Pune | Oct 8, 2025 पुणे सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथील कांबळे स्टॉप या ठिकाणी बांधकामाचे लोखंडी गज वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पो ने स्कूल बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये बसच्या पाठीमागील काचा फुटल्या व लोखंडी गज थेट बसमध्ये शिरले. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही पाच विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहे.