लातूर: वलिम्यावरून परतणाऱ्या कुटुंबाचा लातूरच्या उस्मानाबाद-रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भीषण अपघात :एकाचा जागीच मृत्यू,3 गंभीर
Latur, Latur | Sep 16, 2025 लातूर -उस्मानाबाद-रत्नागिरी–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वलीम्यावरून परतणाऱ्या कुटुंबाला काल रात्री अपघाताचा जबरदस्त फटका बसला. ऑटो रिक्षा आणि भरधाव वेगातील भाजीपाला मालवाहू पिकअप यांच्यात झालेल्या भीषण धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. चार लहान मुलांसह एकूण आठ प्रवासी या ऑटोमध्ये होते.ही घटना 15 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. असे माहिती आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी दिली आहे.