नागपूर शहर: 'देऊळ बंद' चित्रपटाचा सामाजिक पुढाकार: नफ्यातील संपूर्ण रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी!
समाजातील नकारात्मकता दूर करून प्रेक्षकांच्या मनात सकारात्मक विचारांची पेरणी करण्याच्या उद्देशाने लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी 'देऊळ बंद' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. केवळ मनोरंजनाचे साधन न ठरता, हा चित्रपट सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण ठरत आहे.