अलिबाग: विरार-अलिबाग मार्गिकेला प्रशासकीय मान्यता
Alibag, Raigad | Apr 22, 2026 राज्यातील दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या विरार ते अलिबाग या 128 किमी लांबीच्या बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकला (मल्टिमोडल कॉरिडॉर) अखेर राज्य सरकारकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 31 हजार 793 कोटी 47 लाख रुपये खर्च अपेक्षित असून, हा राज्यातील आतापर्यंतचा सर्वात महागडा रस्ता प्रकल्प ठरणार आहे.