पुसद: तीन पुतळा चौकमधून दूरदर्शन केंद्रापर्यंत रस्त्याची खस्ताहाल अवस्था
Pusad, Yavatmal | Sep 30, 2026 पुसद शहरातील तीन पुतळा चौक ते दूरदर्शन केंद्र रस्ता खराब झाला आहे. वाहनांची बेकायदेशीर पार्किंग आणि फूटपाथवरील व्यापाऱ्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. डॉ. आरिफ अहमद यांच्या दवाखान्याजवळील गटारीवर मोठा दगड अपघातासाठी जबाबदार आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे.