तुमसर: सोंड्या येथे अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टरवर सिहोरा पोलिसांची कारवाई, चालक- मालका विरुद्ध गुन्हा दाखल
तुमसर तालुक्यातील सोंड्या येथे दि. 18 सप्टेंबर रोज गुरुवारला रात्री 11 वा.च्या सुमारास सिहोरा पोलीस पेट्रोलिंगवर त्यांना विना क्रमांकाच्या दोन ट्रॅक्टर मधून विनापरवाना दोन ब्रास रेती वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी दोन ट्रॅक्टर व दोन ब्रास रेती असा एकूण 12 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर शरनागत व ट्रॅक्टर मालक सम्यक दहाट तसेच ट्रॅक्टर चालक मनीष भलावी व ट्रॅक्टर मालक सतीश चौधरी यांच्याविरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे