यावल: यावल तालुक्यातील पिळोदा येथून ५४ वर्षीय इसम झाला बेपत्ता, फैजपूर पोलीस ठाण्यात नोंदवली हरवल्याची तक्रार
Yawal, Jalgaon | Sep 26, 2025 यावल तालुक्यात पिळोदा हे गाव आहे. या गावातील बेघर वस्तीमध्ये कैलास प्रल्हाद जवरे वय ५४ हा इसम आपल्या घरी होता. दरम्यान तो आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेला आणि बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून आला नाही. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.