सेनगाव: पानकनेरगांव-म्हाळसी परिसरात उभारण्यात येणाऱ्या सोलार प्लांटमुळे होणार मोठा फायदा,प्रोजेक्ट मॅनेजर उपाध्याय
सेनगांव तालुक्यातील पानकनेरगाव ते म्हाळसी परिसरामध्ये सद्यस्थितीत कुसुम योजनेतून सोलार प्लांट उभारण्यात येत असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच सद्यस्थितीत हे काम प्रगतीपथावर असून जवळपास 35 एकरवर प्रोजेक्ट उभारण्यात येत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागाच्या विकासात भर पडणार असून प्लांट मुळे कमी खर्चात वीज मिळणार आहे. एका वर्षात संपूर्ण काम पूर्ण होणार असल्याची माहिती प्रोजेक्ट मॅनेजर उपाध्याय यांनी दिली.