नागपूर शहर: कोतवाली हद्दीतील कुलूपबंद घर फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास
17 मे ला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दसरा रोड, मांगपुरा येथे एक घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. वैशाली रमेश मेश्राम या आपल्या घराला कुलूप लावून कुटुंबासह नातेवाइकांकडे जेवणासाठी गेल्या होत्या.याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोराने घराच्या मुख्य दाराचे कुलूप आणि कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोराने देवघरातील लोखंडी अलमारीतून ७,००० रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण १,६०,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादीच्या तक्रारीवरून क