नागपूर शहर: नागपूरकरांच्या भक्तीचा 'रिंगण सोहळा'; विठ्ठल नामाच्या जयघोषाने बडकस चौक दुमदुमला
आषाढी वारीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून नागपुरात श्री महावैष्णव नागपूरकर दिंडी २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने नागपूरच्या बडकस चौकात आयोजित करण्यात आलेला भव्य रिंगण सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.आगामी पंढरपूर वारीच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या एकदिवसीय पायी दिंडीत मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविकांनी सहभाग नोंदवला.