नागपूर शहर: नागपुरात स्वयंसेवी संस्थांच्या आड धर्मांतरणाच्या सक्तीचा प्रयत्न, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया
नाशिक मधील टीसीएस कंपनीतील धर्मांतरण प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली असतानाच नागपुरातही स्वयंसेवी संस्थेच्या आड तरुणीशी अश्लील चाळे करून धर्मांतरणाच्या सक्तीचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे याप्रकरणी पोलिसांनी रियाज काझी याला अटक केली असून यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे