नागपूर शहर: नागपुरात वाहन चोरीचा गुन्हा उघड; गुन्हे शाखा युनिट २ कडून आरोपीला अटक
21 मे ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंत स्टेडियमसमोरील पार्किंगमधून चोरलेली होंडा अॅक्टिव्हा दुचाकी शोधण्यात नागपूर गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.राजा खान सलीम खानयाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपला साथीदार समीर उर्फ गिज-या शमीम शेख.याच्यासोबत मिळून ही चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचे वाहन वर्धा पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्यात आधीच जप्त केल्याचे समोर आले आहे.