हिंगणघाट: आगाराचे जुन महिन्यात २९ लाख ४४ हजार उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या चालक,वाहक व तांत्रिक यांचा सत्कार
हिंगणघाट आगाराच्या वतीने माहे जून २०२५ मध्ये हिंगणघाट आगारातील चालक,वाहक,यांत्रिकव इतर कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने रु.२९.४४ लाखाचे फायद्यात आल्यामुळे जास्त इंधन (डिझल) बचत करणारे चालक गुलाब कळसकर ,मंगेश खंडाते,प्रकाश लाखे ,विजय सोगे, श्रीकांत मोकळे आगारातील जास्त उत्पन्न मिळवून देणार वाहक.अल्ताफ मिर्झा,.दलीत खंडागळे,. रऊफ खान,.तुळशीराम उघडे,विलास राऊत चालक प्रमोद तांदूळकर चालक संजय मेहेत्रे आणि उत्कृष्ट कामगिरी करणारे यांत्रिक.किशोर कांबळे,.मंगेश सयाम याचा सत्कार करण्यात आला.