नागपूर शहर: धर्मपरिवर्तन आणि लैंगिक शोषणाचे प्रकरण: फरार मौलवीला अटक : तसरे पोलीस निरीक्षक
सोनेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसरे यांनी 18 जून ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार,धर्मपरिवर्तन आणि लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपी मौलवीला अटक केली आहे. दरम्यान, मुख्य आरोपीसह दोघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले, जिथे त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपी मौलवी मजहर मेहमूद मकसूद हा छिंदवाडा जिल्ह्याचा रहिवासी आहे. सोनेगाव पोलीस त्याचा शोध घेत होते आणि त्याला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या गावीही गेले होते.