जळगाव: काँग्रेसने स्वबळाची घोषणा केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगाव येथे विरोधकांवर टीका केली आहे
चांगल आहे त्यांना त्यांचे मत शाबूत ठेवायचे आहेत त्यांनाही पुढे राजकारण करायचं आहे मला नाही वाटत ते एकत्र म्हणून लढतील. काही पक्षांना उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं झालं आहे. आमची युती, आमची युती आम्ही एकत्र अस झालं आहे. युतीच्या विषयावरून गिरीश महाजन यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आज दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता चाळीसगाव येथे टोला लगावला आहे.