अमरावती: काँग्रेसची 'काळी दिवाळी' अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी बेसन भाकर खाऊन सरकारचा निषेध
अमरावती जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज १७ ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी दीड वाजता अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 'काळी दिवाळी' आंदोलन करण्यात आले. खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी आंदोलनात सहभागी होत दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात गोडधोड पदार्थ आणि मिष्टान्नावर बहिष्कार टाकत, आंदोलकांनी साध्या पद्धतीने बेसन -भाकर खाऊन महाराष्ट्र सरकारचा निषेध नोंदवला.या आंदोलनात काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले..