खंडाळा: बावडा येथे अज्ञात चोरट्यांनी केली ३१ हजार ६५० रुपयांची घरफोडी; खंडाळा पोलीसांत गुन्हा नोंद
बावडा ता. खंडाळा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत सोन्याची चैन व रोकड असा ३१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.खंडाळा पोलीसांनी शनिवार दि. १४ सप्टेंबर२०२४ रोजी दुपारी ४वाजता सांगितले की दि.२६ ऑगस्टला बावडा ता. खंडाळा येथे विजय भोसले यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन घरातून सोन्याची चैन व रोकड असा ३१ हजार ६५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. विजय अशोक भोसले (रा. बावडा) यांनीपोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.