धुळे: भारत-पाक सामन्याविरोधात धुळ्यात झाशी राणी चौक परिसरात ठाकरे गट आक्रमक; पंतप्रधान मोदींना पाठवला सिंदूर!
Dhule, Dhule | Sep 14, 2025 धुळे शहरातील झाशी राणी चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या महिला आघाडीतर्फे ‘माझं कुंकू-माझा देश’ मोहिमेअंतर्गत पाकिस्तानविरुद्ध तीव्र आंदोलन झाले. केंद्र सरकारने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यास दिलेल्या परवानगीचा निषेध करत शेकडो महिलांनी घोषणाबाजी केली. जवान शहीद होत असताना पाकिस्तानशी सामना खेळणे योग्य नसल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला. संताप व्यक्त करण्यासाठी महिलांनी एकमेकींना कुंकू लावले व पंतप्रधानांना सिंदूरचा बॉक्स पाठवला.