नागपूर शहर: अयोध्या नगर येथे चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात
19 एप्रिल ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अयोध्या नगर येथे राहणाऱ्या सुनंदा लोखंडे यांच्या घरी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. मुख्य म्हणजे यातील आरोपी हा अल्पवयीन असून तो सुनंदा यांचा नातेवाईक आहे. गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाने आरोपीकडून सोन्या चांदीचे दागिने असा एकूण चार लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून ही कार्यवाही पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांच्या मार्गदर्शन