कास–बामणोली रस्त्यावर अंधारी फाट्याजवळील धोकादायक ‘एस’ कॉर्नरवर रविवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एस. टी. बस आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. साताऱ्याकडून बामणोलीकडे मालवाहतूक करणारा डंपर उतारावरून मोठ्या वेगात येत होता. अचानक त्याचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने वाहन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र पुढे येणाऱ्या तेटली–सातारा एस. टी. बसला थेट धडक बसली.