नागपूर शहर: लकडगंज पोलिसांची कारवाई: घातक शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला अटक
28 जूनला रात्री 8:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगा जमुना परिसरात गस्त घालत असताना, पोलिसांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या निखील राजेश नंदेश्वर (वय २०, रा. पाचपावली, नागपूर) या तरुणाला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक धारदार फोल्डिंग चाकू सापडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.