नागपूर शहर: ऑटोतून पेट्रोल काढून पत्नीला केला जाळण्याचा प्रयत्न, आरोपी पोलिसांच्या ताब्यात : हरेश काळसेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 24 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीचा घरगुती वाद इतका टोकाला गेला की आरोपी पतीने ऑटोतून पेट्रोल काढून ते आपल्या पत्नीच्या अंगावर टाकले आणि चक्क लाईटर लावले. ज्यामध्ये पत्नी भाजल्या गेली या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून आरोपी ऑटोचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिली आहे.