हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उद्यापासून पुढील चार ते पाच दिवस पावसाची विश्रांती राहणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र, १४ जुलैपासून पावसाचे पुनरागमन होऊन परिस्थिती पुन्हा सुरळीत होईल.